विशाखापट्टणम येथील रिफायनरीला भीषण आग

विशाखापट्टणम – येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या पेट्रोकेमिकल संकुलामध्ये शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत एक जण मरण पावला असून ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या पेट्रोकेमिकल संकुलामधील रिफायनरीत असलेल्या शीत टॉवरमध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाल्याकचे प्राथमिक माहितीच्या आधारावर समजते. या दुर्घटनेत एक जण मरण पावला असून ३५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे चार वाजेच्या सुमारास लागलेली आग नियंत्रात आली असल्याची माहिती येथील पोलिस आयुक्त बी. शिवधर रेड्डी यांनी दिली.

रात्री लागलेल्या या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. शीत टॉवरमध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक माहितीच्या आधारावर समजते.