उद्येागपती डॉ नीलकंठ कल्याणी यांचे निधन

पुणे,- महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग व्यवसायाला मोठी गती दिलेले उद्योगपती थेार उद्योगपती डॉ नीलकंठ कल्याणी यांचे आज सायंकाळी वयाच्या सत्यांऐशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. फोर्जिंग म्हणजे मोठमोठ्या वाहनांना व मोठ्या मशीन्सना ते बनविण्याचा जो ओतीव भाग लागतो, त्या फोर्जिंग मटेरियलच्या निर्मितीतील जगातील क्रमांक दोनचे उत्पादक म्हणून ज्यांनी ख्याती मिळवून भारतीय उद्योगक्षेत्रातील जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांचें भारत फोर्ज व कल्याणी उद्योग समुह अशा दोन उद्योग समुहाचे भारतात व जगातही अनेक कारखाने आहेत. मूळचे सातारा जिल्ह्यातील व कराड तालुक्यातील कोळे गावचे वीर शैव समाजातील असलेल्या व गरीब कुुटुंबातून आलेल्या डॉ कल्याणींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून कामाला आरंभ केला होता. त्यांचा सारा उद्योगसमुह त्यांचे चिरंजीव डॉ बाबा कल्याणी हे सांभाळत आहेत. ते कल्याणी उद्योग समुहाचे अध्यक्ष आहेत त्याच प्रमाणे कायनेटिक उद्योग समुह, सुदर्शन केमिकल उद्योग समुह व कल्याणी इंस्टिट्यूट ऑफ रिसर्च यांचेही अध्यक्ष आहेत. फोर्जिग अहेड हे त्यांचे सविता भावे यांनी लिहिलेले चरित्र आहे.

Leave a Comment