कर बुडविल्यांने सनी देओलला होणार अटक

यमला पगला दिवाना या सिनेमाच्या कॉपी राईट विक्रीद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरील १ कोटी १८ लाखांचा सेवाकर चुकवल्याप्रकरणी अभिनेता सनी देओलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सेवाकर बुडवेगिरी प्रकरण अभिनेता सनी देओलच्या चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सनीला अटक होण्याची शक्यता सूत्रांने वर्तवली आहे.

या प्रकरणी सिनेमाचा निर्माता दिग्दर्शक समीर कर्णिकला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली होती. त्याबरोबरच सनी देओलवरही याच प्रकरणी सेवाकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचमुळे सनी देओलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सनीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असल्यातने आता सनी देओलला अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याहमुळे आगमी काळात सनी देओलविरोधात काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment