भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात बोईंग सी-17 ग्लोबमास्टर विमान

वॉशिंग्टन – भारताच्या सीमावर्ती भागातील दुर्गम ठिकाणी मदत पोहोचविणे आता लष्कराला सहज शक्य होणार आहे. भारतीय वायुसेनेत दाखल नुकत्याच दाखल झालेल्या तिसर्‍या बोईंग सी-17 ग्लोबमास्टर विमानामुळे हे शक्य होणार आहे. अवजड सामानाची वाहतूक करण्याची क्षमता असलेले हे विमान कठीण तसेच कोणत्याही प्रकारच्या धावपट्टीवर सहज उतरू शकते. भारतीय वायुसेनेसाठी हे विमान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरणार आहे.

जून व जुलै महिन्यांत दोन ग्लोबमास्टर विमाने वायुसेनेत समाविष्ट झाल्यानंतर बोईंग कंपनीशी झालेल्या करारानुसार भारतीय वायुसेनेस 10 ग्लोबमास्टर विमाने समाविष्ट करण्यात येणार आहे. या वर्षी 2013 आणखी दोन, तर पुढील वर्षी इतर पाच ग्लोबमास्टर विमाने करारानुसार भारतात दाखल होणार आहेत. या ग्लोबमास्टर विमानांच्या समावेशानंतर भारत हा अमेरिकेचा अपवाद वगळता वायुसेनेत ग्लोबमास्टर विमानांची सर्वांत मोठा तुकडी असलेला देश ठरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शस्त्रसज्ज वाहने,रणगाडा यांसहित ग्लोबमास्टर विमानाची प्रचंड लष्करी साहित्य वाहून नेण्याची क्षमता आहे. बोईंग कंपनीने आत्तापर्यंत 256 ग्लोबमास्टर विमाने विकली असून त्यांपैकी 222 विमाने निव्वळ अमेरिकन वायुदलातच असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतासहित ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कतार, ब्रिटन व इतर देशांमध्ये ग्लोबमास्टर विमाने आहेत.

चीनबरोबरील पश्‍चिम विभाग (अक्साई चीन) सीमारेषा तसेच हिमालयामधील भारतीय लष्कराच्या इतर मोक्याच्या ठिकाणांना लष्करी मदत पोहाचीविणे या विमानांमुळे भारतीय लष्कराला सहज शक्य होणार आहे