वॉशिंग्टन – पाकिस्तान सैन्याने काश्मीमरमधील पूंछ भागात पाच भारतीय जवानांची हत्या केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वशभूमीवर आपल्या काश्मीतरविषयक धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे अमेरिकेने आज (शुक्रवार) स्पष्ट केले. याबरोबरच, भारत व पाकिस्तानमधील चर्चेची व्याप्ती व गती’ ठरवावी, असे आवाहनही अमेरिकेने केले आहे.
काश्मीर धोरणात बदल नाही : अमेरिकेचे स्पष्टीकरण
याबाबत बोलताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयामधील प्रवक्त्या जेन साकी म्हणाल्या की, काश्मीरमधील प्रत्यक्ष ताबारेषेवरील हिंसाचाराबद्दल आम्ही चिंताक्रांत आहोत. यासंदर्भात दोन्ही देशांमधील सरकार एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. भारत व पाकिस्तानमधील संवादास अमेरिकेचा पाठिंबा आहे. अमेरिकेच्या काश्मीमरविषयक धोरणामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचा पुनरुच्चार साकी यांनी यावेळी केला. दोन्ही देशांमध्ये अमेरिकेचे प्रभावी अस्तित्व असल्याचे मत साकी यांनी यावेळी व्यक्त केले. काश्मीेरप्रकरणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी आत्तापर्यंत भारत वा पाकिस्तानला कोणत्याही स्वरूपाचे आवाहन केलेले नाही.
भारत पाकिस्तानमधील संघर्षाचा अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर परिणाम घडून येण्याची शक्यपता साकी यांनी फेटाळून लावली. अफगाणिस्तानमध्ये दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भविष्यातदेखील दोन्ही देश आपली भूमिका योग्यपणे पार पाडतील असा अमेरिकेला विश्वा स वाटतो, असेही साकी यांनी सांगितले.
