ही वेळ राजकारण करण्याची नाही – गृहमंत्री

मुंबई – शक्तीमिल सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर गृहमंत्र्यांवर विरोधी पक्षांकड़ून टीका करण्यात आली होती, तसेच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आल्यानंतर आज (शुक्रवार) गृहमंत्री आर. आर. पाटलांनी ही राजीनामा देण्याची अथवा टीकाकारांना उत्तरं देण्याची योग्य वेळ नसून राज्यातील पिडीत महिलांना न्याय देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे असे सांगत टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले आहे.

महिला पत्रकारांसाठी विशेष योजना सुरु करण्यात येणआर असल्याचे सांगत महिला पत्रकारांना आवश्यकतेनुसार पोलिस संरक्षण पुरवण्यात येईल अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. तसेच पिडीत तरुणीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन उचलणार असून या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठई जातीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही वेळ राजकारण करण्याची नाही, ज्याला कोणाला राजकारण करुन माझा राजीनामा मागायचा आहे त्यांना राजकारण करु द्या असे सांगत ही वेळ टीकाकारांना उत्तरे देण्याची नाही असेही यावेळी पाटील म्हणाले.

शक्तीमिल सामुहिक बलात्कार प्रकरणाची केस फास्टट्रॅक न्यायालयात चालवली जाईल, तसेच पिडीत तरूणीच्या परिवाराकडून ज्या वकिलाची मागणी होईल तो वकील त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून दिला जाईल अशी माहिती आर.आर.पाटील यांनी दिली. मुंबईतील सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांवर टीकेचा भडीमार करत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Leave a Comment