जम्मू, – जम्मू व काश्मीरच्या किश्तवाड शहरात सतत 12व्या दिवशी आजही संचारबंदी सुरू आहे. पोलिसानी नऊ ऑगस्टला एक दुकानातून दंगलखोरांद्वारे लुटलेल्या नऊ बंदूक जप्त केल्या. येथे संचारबंदीत सोमवारी चार तासाची सूट दिली होती आणि दरम्यान स्थिती सामान्य राहिली आणि कोणत्याप्रकारची अप्रिय घटना घडली नाही.
किश्तवाडचे जिल्हाधिकारी बशीर अहमद खान यांनी सांगितले शहराच्या दोन विविध भागात संचारबंदीत दोन-दोन तासाची सुट देण्यात आली. त्यांनी सांगितले संचारबंदीत दिलेल्या सुटदरम्यान स्थिती शांतिपूर्ण राहिली. पोलिसांनी किश्तवाडमध्ये स्थानिक दुकानतून लुटलेल्या 22 पैकी नऊ बंदुक जप्त केल्या. या संदर्भात काही लोकांना अटकही करण्यात आले आहे.
नॅशनल कॉफन्स (एनसी), काँगेस, भारतीय जनता पक्ष (भाजपा), समाजवादी पक्ष (सपा), जम्मू व काश्मीर नॅशनल पँथर्स पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकपा), शिरोमणी अकाली दल, बहुजन समाज पक्ष (बसपा), राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या (एनसीपी) सर्वदलीय प्रतिनिधि मंडळाने किश्तवाडमध्ये अल्पसंयांक समुदायाच्या 70 प्रतिनिधींची सोमवारी सायंकाळी भेट घेतली. हे प्रतिनिधि मंडळ आज बहुसंख्यांक समुदायाच्या प्रतिनिधींची भेट घेईल.