काश्मीर ही पाकिस्तानची प्राणवाहिनी – शरीफ

इस्लामाबाद – काश्मीर ही पाकिस्तानची प्राणवाहिनी असल्याचे मत पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले. याबरोबरच, काश्मीरवरून भारत व पाकिस्तानने युद्ध करण्यापेक्षा येथील गरीबी व रोगराई दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादनही शरीफ यांनी यावेळी केले.

काश्मीर हा पाकिस्तानसाठी राष्ट्रीय विषय असून इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणेच या समस्येविषयी मलाही आत्मीयता आहे,’ असे शरीफ यांनी आपल्या भाषणात सांगितले. जूनमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शरीफ यांनी आज पहिल्यांदाच देशाशी आपल्या भाषणाच्या माध्यमामधून संवाद साधला.