नवी दिल्ली: दिल्लीतल्या कमला मार्केट पोलिस स्टेशनमध्ये आसाराम बापूंविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोधपुरमधील एका अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये आसाराम बापूंविरोधात कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

जोधपुरमधल्या एका अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आसाराम बापूंने आश्रमात बोलावून तिच्यासोबत गैरवर्तणूक केली. ही मुलगी आसाराम बापूंच्याच छिंदवाड़ा येथील गुरुकूलमध्ये बारावीत शिकत आहे. पण ही घटना जोधपूरची असल्याने दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जोधपूर पोलिसांकडे सोपवला आहे.
दरम्यान, याबाबतचे सर्व आरोप आसाराम बापूंनी फेटाळून लावले असून सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. केवळ आपल्याला बदनाम करण्याच्या हेतूने अशाप्रकराचे आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.