सिंधुरक्षक पाणबुडीतील दोघांचे मृतदेह सापडले

मुंबई, – दोन दिवसांपूर्वी आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीत शक्तिशाली स्फोट आणि आगीमुळे बुडालेल्या १८ बेपत्ता कर्मचा-यांपैकी दोन नौसैनिकांचे मृतदेह सापडले आहेत. नौदलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली असून इतर १६ जवान अद्याप बेपत्ता आहेत. पंधरा जवानांचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

बुधवारी दोन शक्तिशाली स्फोटांनंतर सर्वत्र पसरलेल्या आगीमुळे भारतीय नौदलाच्या आरमारातली आघाडीची पाणबुडी आयएनएस सिंधुरक्षकने जलसमाधी घेतली. या पाणबुडीसोबत त्यात अडकलेल्या १८ नौदल अधिकारी व जवानांचाही मृत्यू झाला असावा, अशी भीती वर्तविण्यात येत होती.

ती आता खरी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. आत अडकून पडलेल्या तीन अधिकारी आणि पंधरा जवानांचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दोन नौसैनिकांचे मृतदेह सापडले असून इतर १६ जवानांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरु आहेत.