पंतप्रधानावरील मोदी यांची टीका अयोग्य- अडवाणी

नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका अयोग्य होती. यादिवशी त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही, अशी नाराजी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली. मोदींना हा घरचा आहेर असल्याचे म्हटले जात आहे.

पुढे बोलताना आडवाणी म्हणाले, ‘पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे भाषण ऐकले आहे. भारताकडे मोठी क्षमता आहे, असे सांगून अडवाणी यांनी ही टीकेची योग्य वेळ नाही. स्वातंत्र्यदिन हा एकमेकांवर टीका करण्याचा दिवस नाही. स्वातंत्र्यदिनी वैयक्तिक टीका करणे टाळले पाहिजे.’

भूज येथे ध्वजारोहण केल्यानंतर मोदी यांनी पंतप्रधानांवर टीका केली होती. त्यानंतर आडवाणी यांनी नाराजी व्यक्त करणे म्हणजे भाजपमधील वाद पुन्हा चव्हाटय़ावर आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाबाबत अडवाणी यांनी नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यदिन हा एकमेकांवर टीका करण्याचा दिवस नाही. स्वातंत्र्यदिनी वैयक्तिक टीका करणे टाळले पाहिजे, असे आडवाणी म्हणाले.

Leave a Comment