सोने ३० हजाराच्या पुढे, शेअर मार्केट कोसळले

मुंबई – केंद्र सरकारने वित्तीय तूट कमी करण्याच्या हेतूने सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क वाढविल्याने सोने दरात विक्रमी वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी १०९४ रूपयांनी वाढ होऊन सोने ३० हजार ४१२ प्रति तोळा झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रूपया ६२ रूपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाल्याने बाजार कोसळला आहे.

केंद्र सरकारने घसरणा-या रुपयाला आधार देण्यासाठी सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क दहा टक्क्यांवर नेले. त्यामुळे सोने दरात वाढ होण्याचे संकेत होते. सोन्याचा मंगळवारी भाव प्रति दहा ग्रॅम २९, ६६० रुपये होता. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा आयात शुल्कातील आतापर्यंतच्या वाढीमुळे ग्राहकांना सोने जवळपास २५०० रुपये प्रति दहा ग्रॅम महाग पडत आहे. आज सकाळी सोने दराने उसळी मारल्याने सोने ३० हजारांचा टप्पा पार केला.

आंतरराष्ट्रीय बाजाराच्या घडामोडींचा रूपयावर परिणाम झाला आहे. रूपयाला सावरण्याचा प्रयत्न होत असला तरी डॉलरच्या तुलनेत ६२ रूपयांच्या घरात रूपया गेला आहे. हा रूपयांचा निच्चांक आहे. याचा सर्वपरिणाम शेअर मार्केटवर दिसून आला असून त्यामुळे शेअर मार्केटवर झाल्या्ने बाजार कोसळला आहे.

Leave a Comment