मुंबई, (प्रतिनिधी) -जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात आपला कोणताही संबंध नव्हता. हा बॉम्ब ठेवताना यासीन भटकळसोबत कतिल सिद्दीकी होता. तसा अहवाल दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आणि बंगळूरू पोलिसांच्या क्राईम ब्रँचने दिला आहे. पोलिसांनी आपल्याला जाणूनबुजून गोवल्याचा दावा आज हिमायत बेगच्या वकील अॅड. मोहम्मद प्रचा यांनी उच्च न्यायालयात केला.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात माझा संबंध नव्हता – हिमायत बेग
याप्रकरणी बेगला झालेली फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेला अर्ज आणि बेगने फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या अपिलावर न्यायमूर्ती विजया कापसे तहिलरामाणी आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर नियमित सुरू आहे. यावेळी बेगने हा दावा करताना आपल्याला आणखी काही पुरावे सादर करण्याबरोबरच साक्षीदारांच्या पुन्हा साक्ष नोंदविण्याची विनंती अॅड. मोहम्मद प्रचा यांनी न्यायालयाला केली.
