पवार काय बोलतील नेम नाही – राज ठाकरे

मुंबई – शरद पवार कधी काय बोलतील याचा नेम नाही. ते काय बोलतात ते सात-आठ महिन्यांनंतर कळते, असे वक्तव्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचले आहे. राज यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नसली तरी येत्या काळात त्यावरून मनसे- राष्ट्रवादीत वादंग उभे राहण्याची शक्यता आहे.

राज यांनी आज मुंबई बँकेच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई बँकेच्या संचालक मंडळात सर्व पक्षाची मंडळी असताना बँकेचे कामकाज व्यवस्थित चालते मग सरकार सुरळीत का चालू शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.

तसेच रिक्षा आणि टॅक्सींची परमीट मराठी मुलांनाच मिळाली पाहिजेत, ती कोणत्या पक्षाची आहेत हे महत्त्वाचे नाही, असा पुनरूच्चार राज यांनी केला. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.

नाशिकमध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे दोन गर्भवती महिलांची तर रिक्षातच प्रसूती झाली होती. यावरून सत्ताधारी मनसेवर चौफेर टीका होत आहे. याबाबत बोलताना या खड्ड्यांचे खापर तुम्ही माझ्यावर फोडू नका. नाशिकमध्ये जे रस्ते आहेत, ते अगोदरचे आहेत. आमच्या हातात सत्ता मिळून दीड वर्षच झालं. आता चांगल्या रस्त्यांसाठी टेंडर निघतायेत. तुम्हाला तेथे लवकरच चांगले रस्ते दिसतील, असे राज म्हणाले.

.

Leave a Comment