लखनौ – उत्तर प्रदेशमधील राजकारण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच तापायला लागले आहे, या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, जास्तीजास्त मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आज आम आदमी पार्टीने देखील याच पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. पत्रकारपरिषदेत याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. जर आम आदमी पार्टीचे सरकार उत्तर प्रदेशमध्ये आले, तर राज्यातील जनतेला ३०० यूनिट मोफत वीज दिली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
आम आदमी पार्टी की सरकार बनने पर UP को मिलेगी –
1️⃣प्रति घर 300 यूनिट मुफ्त बिजली
2️⃣किसानों को मुफ़्त बिजली
3️⃣पुराने बकाया बिल माफ़
4️⃣24 घंटे बिजली21वीं सदी के UP को 24 घंटे बिजली मिलनी चाहिए।#KejriwalKiBijliGuarantee pic.twitter.com/9VoARdFFmf
— Manish Sisodia (@msisodia) September 16, 2021
उत्तर प्रदेश में महँगी बिजली के बिलों से मुक्ति दिलाने के सम्बंध में एक महत्वपूर्ण घोषणा .
आम आदमी पार्टी की सरकार बनने के 24 घंटे के अंदर हर आदमी तो घरेलू उपयोग के लिए 300 यूनिट तक बिजली फ़्री मिलेगी https://t.co/VdTJOL53qf
— Manish Sisodia (@msisodia) September 16, 2021
मनीष सिसोदिया यांनी याबाबत ट्विट देखील केले असून त्यामध्ये ते म्हणतात, उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना अवास्तव वीज बिलांपासून मुक्ती देण्यासंबंधी एक महत्वपूर्ण घोषणा..आम आदमी पार्टीचे सरकार आल्याच्या २४ तासांत प्रत्येक व्यक्तीस घरगुती वापरासाठी प्रत्येक महिन्याला ३०० यूनिट पर्यंत मोफत वीज मिळेल. याशिवाय जुने वीज बील माफ, प्रत्येक घरी २४ तास वीज, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे देखील आश्वासन आम आदमी पार्टीकडून देण्यात आले आहे.