“हलकट जवानी”, ”फेव्हिकॉल से” या धमाकेदार आयटम नंबर नंतर बेबो करीना कपूर एका पंजाबी गाण्यावर आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे. ” गोरी तेरे प्यार मे ” या तिच्या आगामी चित्रपटात हे पंजाबी गाण असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करीना इम्रान खान सह या पंजाबी गाण्यावर थिरकणार आहे. मिका सिंग ने हे गाण गायलं असून रेमो डिसूजाने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली हिरू यश जोहर आणि करण जोहर यांनी प्रोड्यूस केलेल्या ” गोरी तेरे प्यार मे “ या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनीत म्हलोत्रा करणार आहे. या पंजाबी गाण्यात करीना घागरा-चोली मध्ये दिसणार आहे. प्रसिध्द ड्रेस डिझायनर मनीष म्हलोत्रा याने ही घागरा-चोली डिझाईन केली आहे.