संजूबाबाचा ’पोलिसगिरी’ पाहून रडली मान्यता दत्त

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेला पोलिसगिरी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. नुकतंच या सिनेमाचे स्क्रीनिंगही पार पडले..यावेळी संजूबाबाला सा-यानीच मिस केले. संजूबाबा जेलमध्ये भरती झाल्यानंतर बिग स्क्रीनवर झळकलेला त्याचा पहिला सिनेमा ठरला तो पोलिसगिरी. जरी या सिनेमात पोलिसाच्या प्रमुख भूमिकेत संजूबाबा असला तरी सध्या तो जेलमध्ये कैद्याची भूमिका अगदी चोख पणे बजावतोय.

स्क्रीनिंगच्यावेळी संजयची पत्नी मान्यता आवर्जून हजर होती…यावेळी उपस्थित असलेल्या दिग्गजांना संजूबाबाला किती मिस करताय असे विचारताच… मान्यताला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि तिला रडू कोसळले.