नव्या गर्लफ्रेंडसाठी सलमानने शोधले घर

बॉलिवूडचा ’दबंग’ ,सलमान खान हा इतरांना मदत करण्यत नेहमीच तत्पर असतो. विशेषतः सिनेसृष्टीत पाऊल ठेवू इच्छिणार्यार नवोदित अभिनेत्रींचा सलमान खान हा मोठा आधार ठरतो. आता आपली तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया वंटुरसाठी सलमान खानने कार्टर रोड येथे घर शोधले आहे. या आधीही सलमान खानने आधीची गर्लफ्रेंड कतरिना कैफसाठी घर मिळवले होते.

४७ वर्षीय सलमान खान गेले ३ महिने आपल्या कुटुंबासोबत कार्टर रोड येथे राहात आहे. या भागात त्याने लुलियासाठी घर मिळवले आहे. सलमानचे घर असलेल्या बांद्रा मधील गॅलेक्सी हाईटस या इमारतीचे नुतनीकरण सुरू असल्यामुळे सलमान सध्या कार्टर रोडलाच राहात आहे.

सलमान आणि रोमानियन टीव्ही अभिनेत्री लुलिया वंटुरचे प्रेमप्रकरण चर्चेत आहे. ’मेंटल’ सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमान खान लुलियासोबतच सतत असायचा. दोघांनी चोरून लग्न केल्याच्या वावड्याही उठल्या होत्या. मात्र सलमानचे वडील सलीम खान यांनी या अफवांचे खंडन केले होते. एक मात्र खरं, की लुलियावर सलमान खान सध्या जरा जास्तच मेहेरबान झाला आहे.

Leave a Comment