गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा टायगर सलमान खान सध्या रोमानियन टीवी स्टार लुलिया वंतुर सोबत डेटिंग करीत असल्याची चर्चा आहे. याला अजून दोघांनी पण दुजोरा दिलेला नाही. काही दिवसांपूर्वीच सलमानने तिच्या मैत्रणीची भेट आई-वडिलासोबत घालून दिली आहे. त्यानमुळे आता लवकरच सलमान देखील विवाह करणार असल्याची चर्चा आहे.
तसे पाहिले तर काही दिवसांपूर्वी कैटरिना कैफ सोबत झालेल्या ब्रेकअपनंतर सलमानची नवीन मैत्रीण कोण यावरून बरीच चर्चा रंगली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला खरे प्रेम मिळाले असलयाची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच सलमानने त्याच्या रोमानियन गर्ल फ्रेंडची भेट पैरेंट्स सोबत घालून दिली असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच सलमान लुलियाला सोबत घेउन त्या्च्याच घरी गेला होता. तिने सलमानच्या घरी मुक्काल देखील केली असल्याची चर्चा आहे. लुलिया अमेरिकेमध्ये राहत असलेली भारतीय आहे. आता ती काही दिवस सलमानच्या घरी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात तिला सलमानची खूप मदत होणार आहे, हे आता वेगळे सांगण्यारची गरज नाही.