दोहा, दि.27 – कतार हा तसा छोटासाच देश आहे. परंतु, प्राकृतिक गॅस आणि तेलाची नैसर्गिक वरदान त्याला मिळालेले आहे. त्यामुळे या वरदानाचा दावेदार राजा अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी याने आपल्या सत्तेची सूत्रे आता आपल्या मुलाकडे सोपवली आहेत.
शेख तमीम’ ने 24 भावंडांमध्ये पटकावली कतारची गादी!
आमीर शेख हमद बिन खलिफा याने कतारच्या राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्याचा मुलगा शेख तमीम बिन हमद अल थानी याच्याकडे सुपूर्द केली. ब्रिटनमध्ये शिकत असलेला अमीर शेखचा मुलगा शेख तमीम याच्या हाती कतारची विशाल धनसंपत्ती आणि गादी सोपवण्यात आली आहे. गादी सोडण्याचा विचार त्यांनी या आधीच केला होता, पण या विचाराला मूर्त रुप त्यांनी आत्ता दिले आहे. अमीर शेख यांच्या मते आता ही जबाबदारी नव्या पिढीकडे दिली गेली पाहिजे. गेली अठरा वर्षे मी कतारचा संपूर्ण कारभार सांभाळला. आता युवा पिढीचे कर्तव्य आहे त्यांनी हा वारस पुढे चालवावा’ असे अमीर शेख यांनी आपल्या मुलाकडे सूत्रे देताना म्हटले आहे.
गेल्या 130 वर्षांपासून कतारमध्ये राजेशाही परंपरा सुरू आहे. 33 वर्षीय युवराज आता हे पद सांभाळणार आहे. अमीर शेख यांना तीन पत्नी आणि 24 मुले आहेत. कतार हा देश मध्य पूर्व आणि अरब देशांमध्ये सर्वात धनाढ्य देश मानला जातो. कतारचे नाव आणि त्यांची प्रचंड संपत्ती याची चर्चा युरोपीय देशांमध्येही केली जाते. कतारची लोकसंख्या साधारण 20 लाख इतकी आहे. प्राकृतिक गॅस आणि तेलाची निर्यात यांवर या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. एवढा लहान देश असूनही कतारच्या सरकारकडे 100 बिलियन डॉलरपेक्षा ही अधिक संपत्ती आहे. या देशाची
मोठमोठ्या प्रकल्पामध्ये ही गुंतवणूक केलेली आहे. तसेच कतारने अनेक देशांना कर्जही दिली आहेत. 1995 मध्ये अमीर शेख यांनी कतारचा राज्य कारभार सांभाळण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे 2022 मध्ये होणार्या फिफा वर्ल्डकप’च्या आयोजनात कतारने अमेरिकेलाही मागे टाकले आहे.
