
पठाणकोट- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची रविवारी पंजाबमधल्या माधोपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. भाजपाचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून निवडणूक प्रचाराची सूत्रे स्विकारल्यानंतर मोदींची ही पहिलीच सभा आहे. याच सभेत नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुक २०१४ चे रणशिंग फुकणार आहेत. मोदींना नेतृत्व सोपवल्यानंतर नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडनं एनडीएला रामराम ठोकलाय. त्यामुळे मोदी या सभेत नितीशकुमारांचा कसा समाचार घेतात? याकडं सगळ्याचं लक्ष असेल.
