चॅम्पियन्स कोण आज ठरणार

बर्मिंगहॅम – टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान एजबस्टन येथे चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी रविवारी मेगा फायनल रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील टीम इंडियाची कामगिरी पाहता टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. मायदेशात फायनल होत असल्याने इंग्लंडला होम पिचचा फायदा मिळेल असे वाटते. यामुळे आता चॅम्पियन कोण ठरणार याकडेच सा-याचे लक्ष लागले आहे.

एजबस्टनला टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रंगणार आहे. तिस-यांदा फायनलमध्ये धडक मारणा-या टीम इंडियाचा आत्तापर्यंत प्रवास हा अपराजित राहिली. महाविजय मिळवण्यासाठी टीम सज्ज असेल तर दुसरीकडे आत्तापर्यंत केवळ एकच टी-२० वर्ल्ड कप वगळता एकही मोठा विजय साकारता न आलेल्या इंग्लंडला मायदेशात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी पराकाष्ठा करावी लागेल.

टीम इंडियाच्या शिखर धवनला रोखण्याचे प्रमुख आव्हान इंग्लिश बॉलर्ससमोर असेल. धवन आणि रोहित शर्मा पुन्हा दमदार ओपनिंग देतील अशीच आशा सा-यांना आहे. तर मीडल ऑर्डरची भिस्त विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिकवर असेल. ऑल राऊंडर रवींद्र जाडेजा हा टीम इंडियाचा ट्रम कार्ड ठरतोय. त्याच्याकडून धोनीला पुन्हा एकदा मॅच विनिंग कामगिरीची अपेक्षा असेल.

बॉलिंगमध्ये ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या त्रिकुटावर भेदक आणि अचूक मारा करण्याची जबाबदारी असेल. युवा भुवनेश्वर कुमारचा भेदक मार इंग्लंड बॅट्समनचा अडचणीत आणू शकतो. अशेशपूर्वी इंग्लंडला किक स्टार्ट मिळवून देण्यासाठी कॅप्टन ऍलिस्टर कूक सज्ज असेल. आपली दुसरी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळत असलेल्या इंग्लंडच्या बॅटिंगची धुरा ही जोनाथन ट्रॉटवर प्रामुख्याने असेल. याशिवाय ऍलिस्टर कूक, जो रुट आणि ईयान बेलवरही बॅटिंगची जबाबदारी असेल.

Leave a Comment