बचाव कार्याला ब्रेक; ढगांची गर्दी

गुप्तकाशी : उत्तराखंडात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे या ठिकाणी आता ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. पावसामुळे बचाव कार्याला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढचे २४ तास लष्कर आणि आयटीबीपीसाठी अटीतटीचे असणार आहेत. आतापर्यंत एकाही हेलिकॉप्टरने उड्डाण केलेले नाही.

केदारनाथ आणि परिसरात असलेल्या ३० ते ३२ हजार लोकांना वेळेत बाहेर काढण्याचं आव्हान सरकारपुढं आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या माहितीनुसार आतापर्यंत ७३ हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

दुसरीकडे ज्या लोकांना गौरीकुंड, गुप्तकाशीतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांचे गेल्या सहा दिवसातील अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत. डोळ्यासमोर शेकडो लोक वाहून गेल्याचे भाविक सांगत आहेत. मोठमोठ्या इमारती पत्त्याप्रमाने कोसळल्याने त्यामधील अनेकांचे प्राण गेले आहेत.

Leave a Comment