तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार

औरंगाबाद – गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले बलात्काराचे दृष्टचक्र काही केल्या थांबण्यास तयार नाही. आता हे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. करमाड येथील तीन वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आली आहे. बालिकेला उपचारासाठी औरंगाबाद मधील घाटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

उद्धव उर्फ बंटी काकडे ( वय ३२ , रा . वडखा ) असे त्या नराधामाचे नाव असून तो पिडीत बालिकेच्या शेजारी राहतो. बालिका आईसोबत असतानाच आरोपीने थंडपेय पाजण्याच्या बहाण्याने बालिकेला घरी नेले व तिच्यावर अत्याचार केला. या आरोपीचे लग्न झालेले असून त्यास दोन मुलेही आहेत. पत्नी गावी गेली असताना त्याने हा प्रकार केला. बालिकेला उपचारासाठी औरंगाबाद मधील घाटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासून आरोपीशी कौटुंबिक संबंध असल्याने पिडित बालिकेच्या आईला या प्रकारची शंकाही आली नाही.

बालिकेवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच पालकांनी करमाड पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक एस. बी. पवार यांनी दिली. या प्रकाराबाबत अधिक तपास सुरु आहे.