दुस-या दिवशीही पावसाने झोडपले

मुंबई: सलग दुस-या दिवशीही पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापुरात वीजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वा-यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना गारव्याने दिलासा मिळाला. उस्मानाबाद जिल्ह्यत मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने यावर्षी चांगली सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे सोशल नेटवर्किंग प्रतिक्रीयाने भिजून ओले चिंब झाले आहे.

सांगली, पंढरपूर, जळगाव आणि रायगडातही जोरदार वा-यासह पावसाने हजेरी लावली. राज्यात दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने यावर्षी चांगली सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतक-यांनी पेरणीची तयारी सुरु केली आहे. अजून पावसाने हजेरी लावली तर पेरणीच्या कामास सुरुवात होणार आहे.

दुष्काळ आणि वाढलेला उष्मा यामुळे वैतागलेल्या नागरिकांना या रोहिणी नक्षत्राच्या पावसाने थोडाफार दिलासा दिला आहे.विशेष, म्हणजे केरळात दाखल झालेल्या मान्सूनचीही प्रगती चांगली आहे. त्यामुळे दोन दिवसात मान्सून कोकणच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

Leave a Comment