फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल नेटवर्प साइटस्, यु टयुब, वृत्तपत्र आणि वाहिन्याच्या माध्यमातून यापुर्वीच लोकपिय झालेली आणि रसिकांच्या ओठांवरती रुळलेली ‘दुनियादारी’ चित्रपटाचे नुकतेच म्युझीक लाँच करण्यात आले. दुनियादारी’च्या ध्वनिफितीचे पकाशन अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.
तत्पूर्वी दुनियादारी’च्या पोस्टरचं अनावरण सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर आणि मुलगा सम्राट यांच्या हस्ते करण्यात आलं. भरत पवार यांच्या छायाचित्रणाने सजलेल्या या पोस्टरचं डिझाईन सचिन गुरव यांनी केलं आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याचं वेगळेपण ठरलं ते गायकांनी सादर केलेल्या परफॉर्मन्समुळे.
मराठी चित्रपट इंडस्ट्रीतील 11 नामवंतांनी एकत्र येऊन गायलेलं जिंदगी जिंदगी..’ हे गाणं आणि सोनू निगम व सायली पंकजच्या आवाजातील टिक टिक वाजते डोक्यात..’ या गाण्यांना श्रोत्यांनी या अगोदरच आपल्या पसंतीची पावती दिली आहे. से बँडचे सचिन पाठक (यो), अभिषेक आणि समीर यांच्यासोबत अमितराज आणि पंकज पडघन यांचे संगीत असलेल्या या चित्रपटाची गाणी सचिन पाठक, मंगेश कंगणे, मंदार चोलकर यांनी लिहीली आहेत.
मराठीत वाचकपिय ठरलेली सुहास शिरवाळकर यांची दुनियादारी’ कादंबरी, अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परियाली अशी तगडी स्टारकास्ट आणि संजय जाधव यांचं दिग्दर्शन असलेला दुनियादरी लवकरच प्रदर्शित होणार आहे.