करण घेणार मुलगा दत्तक

बॉलिवूडचा स्टार निर्माता – दिग्दर्शक करण जोहर लवकरच बाप’ बनणार आहे. ही बातमी खुद्द करणनंच दिलीय. आपण बिना लग्नाचाच बाप बनणार असल्याचं त्याने
नुकतेच सांगीतले. करण जोहर एका लहान मुलाला दत्तक घेऊन आपल्या जीवनात आणखीन आनंद भरणार आहे. तो म्हणतो, परिवार ही माझ्यासाठी प्राथमिक गोष्ट
आहे आणि आपला परिवार वाढावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, ती माझीही आहे. माझी आई आणि मी एखाद्या लहान मुलाची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकतो 41 वर्षीय करण अविवाहीत आहे. नुकताच त्यानं आपला 41 वा वाढदिवस मोठ्या धडाक्यात साजरा केला. त्याच्या या सेलिब्रेशनसाठी जवळजवळ संपूर्ण
बॉलिवूड उपस्थित होतं.