मी कोणतेच चित्रपट पाहात नाही – सनी देओल

गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून रांगड्या भूमिका करत प्रेक्षकांचा लाडका हिरो बनलेला सनी देओल प्रत्यक्षात मात्र अतिशय मृदूभाषी असल्याचा अनुभव आहे. अनेक चित्रपटांतून हाणामारी आणि थोड्या क्रूर वाटणार्याभ भूमिका करणारा सनी सांगतो की मला अॅक्टींग करायला आवडते पण चित्रपट पाहण्याची मला अजिबात आवड नाही. मी शक्यतो सिनेमे पाहात नाही. अगदी स्वतःचे सुद्धा नाही.

या मागचे कारण सांगताना तो म्हणतो की माझेच सिनेमे पाहताना मला सतत जाणवते की याहून अधिक चांगले काम आपण करू शकलो असतो. त्यातल्या त्यात ऋषीकपूर आणि रणबीर कपूर यांचा अभिनय त्याला आवडतो आणि तसे काम करायला पाहिजे असेही त्याला वाटत राहते. सनी सांगतो सध्याच्या नव कलाकारांना योग्य प्रकारे काम करण्यापेक्षा सिक्स पॅक दाखविण्यातच अधिक रस आहे. यश प्रत्येकालाच हवे असते पण ते आत्मसन्मानाने मिळविले पाहिजे असे मला वाटते.

मुलगा करण याच्यासाठी सध्या तरी चित्रपट दिग्दर्शनाचे डोक्यात नाही असे सांगताना तो म्हणाला की माझेच चित्रपट सध्या जोरात सुरू आहेत. करणसाठी दिग्दर्शन करायचे तर मला वर्षभर तरी सुट्टी घ्यावी लागेल आणि सध्याच्या कामाच्या गर्दीत ते शक्य होणार नाही.