पीएमएल मुशर्रफ विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार

लाहोर, दि.२९- मुशर्रफ यांनी कायदा मोडून संविधानाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना शासन होणे गरजेचे असल्याने पाकिस्तानी मुस्लिम लीगने (पीएमएल) माजी लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची पूर्ण तयारी केली आहे अशी माहिती पीएमएलचे नेते तारिक आझमी यांनी मंगळवारी दिली.

११ मे रोजी स्थापन करण्यात आलेल्या काळजीवाहू सरकारने मुशर्रफ यांच्यावर कारवाई करण्यास नकार दिला होता. मात्र पीएमएल मुशर्रफ यांच्या चौकशीच्या निर्णयावर ठाम असून परवेज मुशर्रफ देशद्रोही असल्याचे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सिद्ध करणार आहोत असे तारिक आझमी म्हणाले. नवाज शरीफदेखील परवेज मुशर्रफ यांच्या चौकशीबाबत ठाम असल्याचे आझमी यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment