कॉग्निझंट इन्फोसिसला मागे सारून दुसरया क्रमांकावर

नवी दिल्ली दि.२९ – भारतातील पाच सर्वात्तम आय टी सेवा पुरवठादार कंपन्यातील अमेरिकेत मुख्यालय असलेल्या कॉग्निझंटने महसूलाच्या बाबतीत यंदा इन्फोसिसला मागे टाकत दुसरे स्थान मिळविले आहे. या कंपनीने २०१२ मध्ये ७.१ अब्ज डॉलर्सचा जागतिक महसूल गोळा केला आहे. असे गार्टनर रिसर्च कंपनीचे संचालक अनुप रॉय यांनी सांगितले.

आय टी सेवा पुरवठादार क्षेत्रातील पाच प्रमुख भारतीय कंपन्यांनी यंदा जागतिक महसूलात १३ टक्के वाढ नोंदवत ३४.३ अब्ज डॉलर्स म्हणजे १९०० कोटी रूपयांचा महसूल मिळविला आहे. त्यात प्रथम क्रमांकावर टीसीएस कंपनी आहे. त्यांनी १०.९ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळविला आहे. दुसर्याट क्रमांक वर कॉग्निझंट असून त्यांनी ७.१, त्यानंतर इन्फोसिसने ६.७, विप्रोने ५.७ तर एचसीएल टेक्नॉलॉजीने ३.९ अब्ज डॉलर्स अशी कमाई केली आहे.