
मुंबई दि.२८ – सोने आयात कमी व्हावी आणि आयातीसाठी खर्च होत असलेले परकीय चलन वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकने सर्व बॅका तसेच अन्य वित्तिय संस्थांवर सोन्यासाठी कर्ज देण्यावर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे सोन्याची नाणी अथवा ईटीएफ, सोने म्युच्युअल फंड यांच्यावर बँका यापुढे सर्रास कर्ज देऊ शकणार नाहीत. त्यासंबंधीची अधिसूचना रिझर्व्ह बँकेने जारी केली आहे.
