
मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनही गडद होत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लादलेले निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनला भाजपने पाठिंबा दर्शविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तुम्ही उशीरा का होईना पण मदत केली, यासाठी आभारी असल्याचे यामध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे.
तुम्ही उशीरा का होईना पण मदत केली, रोहित पवारांनी मानले फडणवीसांचे आभार
राज्याच्या हितासाठी उशिरा का होईना
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जींकडून सहकार्य मिळाल्याचं पाहून बरं वाटलं! केंद्राकडील प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचं असंच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा! तसंच राज्यात हातावर पोट असलेल्यांसाठी एखादी योजना आणण्याची गरज आहे.— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 5, 2021
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकार्य मिळाल्याचे पाहून बरे वाटलं. केंद्राकडील प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचे असेच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा, असा चिमटाही रोहित पवार यांनी काढला. याशिवाय, राज्यात हातावर पोट असलेल्यांसाठी एखादी योजना आणण्याची गरजही रोहित पवार यांनी बोलून दाखविली.
