भारतीय वायुसेनेत 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी


नवी दिल्ली – भारतीय वायु सेनेत (Indian Air Force) दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय वायु सेनेतील अनेक युनिट्समध्ये ग्रुप सी सिव्हिलियन पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 02 मे 2021 अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.

भारतीय वायुसेना भरती 2021 नुसार, स्टेनोग्राफर, सीनियर काॅम्प्युटर ऑपरेटर, कुक, हाऊस कीपिंग स्टाफ, MTS, LDC, CS आणि SMW Supdt, कारपेंटर, लाॅन्ड्रीमन, हिंदी टायपिस्ट यांसह अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरती एकूण 1524 जागांसाठी होणार आहे.

कोणत्या युनिटसाठी किती नोकर भरती

  • वेस्टर्न एअर कमांड युनिट – 362 पदे
  • सदर्न एअर कमांड युनिट – 28 पदे
  • ईस्टर्न एअर कमांड युनिट – 132 पदे
  • सेंट्रल एअर कमांड युनिट – 116 पदे
  • मेंटनेंस कमांड युनिट – 479 पदे
  • ट्रेनिंग कमांड युनिट – 407 पदे

दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी हे सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक, पेंटर यासारख्या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर बारावी उत्तीर्ण उमेदवार लोअर डिविजन क्लर्क (LDC), स्टेनोग्राफर, हिंदी टायपिस्ट आणि स्टोरकीपर या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर पदवीधर उमेदवार सीनियर कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सुपरीटेंडंट (स्टोर) पदासाठी अर्ज करू शकतात. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. संपूर्ण तपशीलासाठी अधिसूचना वाचा.

भारतीय वायुसेना भरती 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 25 वर्षे असावे. ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना 3 वर्षे, एससी व एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना 5 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 10 वर्षांची सवलत मिळणार आहे.

अर्ज केलेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षा किमान शैक्षणिक योग्यतेवर आधारित असेल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ऑरिजनल डॉक्यूमेंट्स, अॅप्लिकेशन फॉर्म सोबत आणावे लागतील. लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजेंस अँड रीझनिंग, न्यूमरिकल अॅप्टीट्यूड, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेरनेस संबंधी प्रश्न विचारले जातील. पेपर आणि उत्तरपत्रिकांचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत असेल. अधिक माहिती आणि सविस्तर जाहिरातीसाठी भारतीय वायुसेनेच्या indianairforce.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला वेबसाईटला भेट द्या.