हॉलीवूडच्या सिनेमात झळकणार दीपिका, अर्जुन

काही दिवसापूर्वी रिलीज झालेल्या ‘गो गोवा गॉन’ या सिनेमाला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहून प्रोड्यूसर दिनेश विजान खुश झाला आहे. त्यामुळे त्यांनी लगेचच आगामी काळात येत असलेल्या सिनेमाची घोषणा केलीं आहे.या त्याच्या हॉलीवूडच्या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोन, अर्जुन कपूर झळकणार आहेत.

सर्वाना वाटत होते की, दिनेश यावेळी नवीन हिंदी सिनेमाची घोषणा करेल. मात्र दिनेशने यावेळी वेगळा विचार करीत इंग्रजी सिनेमाची घोषणा केली आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार यासिनेमाचे दिग्दर्शन ‘बीइंग साईरस’ तथा ‘कॉकटेल’ या सिनेमाचे दिगदशक होमी अदजानिया हे करणार आहेत. या सिनेमाचे नाव ‘फाइंडिंग फैनी’ असे असून यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि ‘इश्कजादे’ अर्जुन कपूरची जोडी झळकणार आहे.

गेल्या काही दिवसापासून या सिनेमाची स्क्रिप्ट लिहण्याचे काम सुरु आहे. आगामी काळात येणारा हा सिनेमा कहानी रोड ट्रिपवर आधारित आहे. या सिनेमाची सर्व शूटिंग लवकरच गोव्यामध्ये सुरू होणार असल्याचे समजते.