कुत्र्यांसाठी संगणक

लंडन दि.१४ – घरात पाळण्यात येणारी कुत्री मालकाची अनेक कामे करताना आपण पाहतो. या कुत्र्यांना अधिक शहाणे करण्याचा निश्चय ब्रिटनमधील संशोधकांनी केला असून ते कुत्र्यांसाठी संगणक तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे ही कुत्री खेळ खेळतील, घरातील उपकरणे सुरू करू शकतील आणि आपल्या मालकाशी संवादही साधू शकतील असा त्यांचा दावा आहे. कुत्र्यांना संगणक प्रशिक्षित करून त्यांना स्मार्ट डॉग बनविणे हा या प्रकल्पामागचा हेतू आहे तसेच घरातील अपंग व्यक्तींना त्यामुळे मदत मिळावी हाही त्यामागचा उद्देश आहे.

या प्रकल्पाच्या प्रमुख डॉ. क्लारा मॅनसिनी या संबंधात अधिक माहिती देताना म्हणाल्या की कुत्री मालकांची अनेक कामे शिकविल्यानंतर करतात. म्हणजे कुत्री शिकू शकतात. याचाच फायदा घरातील अपंग व्यक्तींना व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. घरातील लाईट लावणे, धुण्याचे मशीन सुरू करणे, आलेल्या फोनना उत्तर देणे ही कामे कुत्री संगणकाच्या सहाय्याने करू शकणार आहेत व त्यामुळे त्यांचा मालकांशी संवाद साधण्याचा नवा मार्गही उपलब्ध होऊ शकणार आहे. कुत्र्यांना येाग्य प्रशिक्षण दिले गेले असले तर  मालक अडचणीत आला तर कांही हुषार कुत्री वेळेवर मदत मिळवितात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. कुत्र्यांसाठी ही कामे अधिक सुलभ व्हावीत यासाठी संगणकाचा वापर केला जात आहे.

यासाठी मोठी प्रकाशमान बटणे , टचस्क्रीन तंज्ञत्रान. वस्तू उचलता येतील, ओढता येतील अशी सोय, संगणकावर आधारित खेळणी की ज्यामुळे कुत्र्यांना एखादे उपकरण कसे वापरायचे याचे ज्ञान मिळू शकेल अशी अॅप्लीकेशन असलेले संगणक तयार करण्यात येत आहेत असेही त्यानी सांगितले.

Leave a Comment