हैदराबाद- आयपीएलच्या सहाव्या हंगामात बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नईसुपर किंग्जने हैदराबाद सनरायझर्सवर 77 धावांनी विजय मिळवला. त्याआधीसुरेश रैनाच्या नाबाद 99 धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जनेहैदराबादपुढे 224 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हैदराबादला 20 षटकातआठ बाद 146 धावांपर्यंत मजल मारता आली.
हैदराबाद सनरायझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चेन्नईच्या फलंदाजांनी पुरेपुर फायदा घेतला. चेन्नई
सुपर किंग्जला माइक हसी आणि मुरली विजय यांनी चांगली सुरुवात करुन दिली.ही जोडी मोठी भागीदारी करेल असे वाटत असतानाच मुरली विजय 29 धावांवर बादझाला. त्यानंतर हसी आणि सुरेश रैना यांनी दुस-या विकेटसाठी 133 धावांची
भागीदारी केली. हसी 67 धावांवर बाद झाला. त्यानंतर सुरेख फॉर्ममध्येसलेल्या सुरेश रैनाने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. त्याने 52 चेंडूत
नाबाद 99 धावा केल्या. चेन्नईने वीस षटकात चार बाद 223 धावांचा डोंगर उभाकेला.
224 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या हैदराबादकडून पार्थिव पटेल (44)आणि थिसारा परेरा (39)वगळता अन्य फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत.चेन्नईकडून मोहित शर्माने सर्वाधिक दोन गडी बाद केले.या विजयासह चेन्नईचे 13 सामन्यांतून दहा विजयांसह 20 गुण झाले आहेत.
त्यामुळे अंतिम चार संघामध्ये त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तरहैदराबादचे बारा सामन्यातून सात विजयासह 14 गुण झाले आहेत. ते गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहेत.