सिमला,-हिमाचलप्रदेशमध्ये आज एक खासगी बस नदीत कोसळल्यामुळे 32 प्रवासी ठार झाले, तर 15 जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर
आहे. याशिवाय, काही प्रवासी वाहून गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हिमाचलमध्ये बस नदीत कोसळून ३२ प्रवासी ठार
कुलू-मंडी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरण्यात आले होते. या बसमधून 60 हून अधिक जण प्रवास करत असल्याचे समजते. कुलूहून ही बस अनिकडे निघाली होती. झिरीनजीक ही बस रस्त्यावरून घसरून बियास नदीत कोसळली. बस नदीत कोसळण्यापूर्वीचालकाने बाहेर उडी घेतली.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदत
आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. रात्री उशीरापर्यंत 32 मृतदेह हाती लागले होते. बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात
आली. दरम्यान, जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले.
