
पाटणा दि. ४ – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या गाडीला आज सकाळी कच्छी दर्गा येथे किरकोळ अपघात झाला असल्याचे वृत्त आहे. येथील पुलावरून जात असताना लालूंच्या चालकाने जोरात ब्रेक मारल्यामुळे गाडीचे विंडशिल्ड फुटले आणि चालकाशेजारी बसलेल्या लालूंच्या चेहर्यावर व डोक्यावर त्या काचांचा मारा झाला. यामुळे लालू यांच्या चेहर्याला आणि डोक्याला जखमा झाल्या. त्यांना त्वरीत पाटणा रूग्णालयात हलविण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले आहेत. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.
