दीपिका झाली रणबीरवर नाराज

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पदुकोन खूप नाराज दिसत आहे. नाराजीचे कारण दुसरे तिसरे काही नसून तिचा मित्र रणबीर कपूरच असल्याचे समजते. रणबीरसोबत फिरण्याची इच्छा असूनही तिला फिरायला मिळत नसल्याने ती नाराज आहे.

दीपिकाच्या प्लैनिंगनुसार तिला रणबीरसोबत ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी यूएई आणि यूके मध्ये फिरायचे होते. त्याची तयारी देखील तिने केली होती आणि त्यामुळे ती एक्साइटेड देखील झाली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून तिने केलेला हा प्लान फेल जाण्याची शक्यता आहे. सध्या दीपिकाला तिच्या कामातून सवड मिळत नाही. सध्या ‘चेन्नैई एक्सप्रेस’ सिनेमाचे शूटिंग मुन्नार मध्ये सुरु आहे. त्या ठिकाणी तिचे शूटिंग शेड्यूल लेट झाले आहे. त्यामुळे तिला शूटिंग सोडून जाता येणार नाही. त्यामुळे दीपिका साध्या अडकून पडली आहे.

रणबीरसोबत जाण्यासाठी दीपिका डायरेक्टरला रिक्वेस्ट करून दिवस-रात्र शूटिंग करण्याचा विचार करीत आहे. त्यातच आता रणबीर लंडनमध्ये असणार आहे. त्यावेळी कैटरीना काही कामानिमित्त त्या ठिकाणी जाणार असल्याने दीपिका खूपच नाराज आहे.

Leave a Comment