२०१४ च्या निवडणूक रिंगणात शरद पवार नाहीत

मुंबई दि. ४ – आगामी म्हणजे २०१४ साली होणारी लोकसभा निवडणूक आपण लढविणार नाही या निर्णयावर केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ठाम असल्याचे पक्षाचे प्रवक्ते नबाब मलीक यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांच्या निवडणूकांनंतर प्रथमच शरद पवार निवडणूक रिंगणाबाहेर राहणार आहेत. अर्थात असे असले तरी पवार लोकसभा निवडणुकांच्या तयारीवर बारीक लक्ष ठेवत असून पक्षाच्या उमेदवारांबाबतही बारकाईने परिक्षण करीत आहेत असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पवारांवर नुकतीच त्यांना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना मलिक म्हणाले की आमच्या पक्षाकडे लोकसभेच्या केवळ २२ जागा आहेत. आमच्या सामर्थ्याची आम्हाला चांगली जाणीव आहे. आणि आता तर पवार निवडणूकही लढविणार नाहीत. त्यामुळे पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आहे हा आरोप चुकीचा आहे.

राष्ट*वादीचे कार्यकर्ते पवार यांना निवडणूक लढविण्याचा खूप आग्रह करत आहेत मात्र पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment