देशभरातले हॉटेल व्यावसायिक आज बंद

दिल्ली : देशभरातले हॉटेल व्यावसायिक सोमवरी एक दिवस बंद पाळणार आहेत. केंद्र सरकारच्या वाढत्या करांचा निषेध करण्यासाठी देशभरातील हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने एक दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या संपामुळे हॉटेलवर अवलंबून असणा-याचे मात्र हाल होणार आहेत.

काही दिवसापासून सरकारने लावलेल्या सेवाकराला हॉटेल व्यावसायिकांचा विरोध आहे. सरकारने एसी हॉटेलमध्ये ४० टक्के बिलावर १२.३६ टक्के कर लागू केला आहे. ज्यामुळे बिलावर ४.९४ टक्के अधिकचा कर ग्राहकांना भरावा लागेल. त्यामुळे आगामी काळात ग्राहकाचे प्रमाण कमी होण्याची शक्याता आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकानी एक दिवस बंदचे हत्यार उपसले आहे. मुंबईत एकूण आठ ते दहा हजार हॉटेल्स आहेत. तर महाराष्ट्रात ही संख्या ८० हजाराच्या घरात आहे. जर या संपातूनही काही निर्णय झाला नाही तर हॉटेल व्यावसायिक कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

या संपामुळे घरातूनच नाश्ता किंवा जेवण करुन निघायला हवे. कारण बाहेर कुठल्यातरी हॉटेलात जाऊन तुम्ही दुपारचे किंवा संध्याकाळचे जेवण प्लॅन करत असाल तर ते शक्य नाही. कारण सोमवारी देशभरातले हॉटेल व्यावसायिक एका दिवसाच्या संपावर आहेत.