मुंबई- गेल्या दोन सामन्यात दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला एक हाती विजय मिळूवून देणारा धडकेबाज फलंदाज डेवेन स्मिथ सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या दोन सामन्यात मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. दोन सामन्यात त्याच्या फलंदाजीमुळे केकेआर व गेलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर विजय मिळवता आला.
लय अबाधित ठेवण्याचा प्रयत्न-स्मिथ
याबाबत बोलताना डेवेन स्मिथ म्हणाला, ‘ आयपीएलमध्ये दोन दिवसापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मिळवलेल्या वियजाने आमचा संघ लयीत आला आहे. ही लय अबाधित ठेवण्यासाठी आम्ही आगामी काळात प्रयत्न करणार आहोत. माझ्यासाठी संघाचा कर्णधार रिकी पोटिंग संघाबाहेर बसला आहे. याची मला कल्पना आहे. त्यामुळेच मी दोन सामन्यात चांगली खेळी करू शकलो.
शनिवारी मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर बंगळुरूचा ५८ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईकडून स्मिथने ३६ चेंडूत ५० धावा काढल्या. आयपीएलमध्ये कोणत्याही विजयाने आत्मविश्वास द्विगुणित होतो. यापुढील सामन्यात चांगली कामगिरी करू याचा मला विश्वास आहे. सातत्यापूर्ण कामगिरीने संघाच्या विजयात योगदान देणार असल्याचे यावेळी बोलताना स्मिथने स्पष्ट केले.
