दिल्ली – भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीला पाहिल्यानंतर मला त्याकाळातील माझीच खेळीची आठवण होत असल्याच्या भावना वेस्ट इंडिजच्या सर विव्हियन रिचर्ड्स यांनी व्यक्त केल्या. एके काळी स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला रिचर्डस यांनी कोहलीच्या खेळाची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
यावेळी बोलताना विव्हियन रिचर्ड्स म्हणाला ‘ नेहमीच मी विराट कोहलीची फलंदाजी बघत असतो. मला आता त्याची फलंदाजी सवयीची झाली आहे ती नेहमीच पाहायला आवडते. विराटची आक्रमकता, आणि त्याच खेळावर असलेले प्रेम माझ्यासारखेच आहे. विराटचा स्वभाव धाडसी आहे. त्याच्यावर कितीही दबाव असला तरी पाय रोवून उभा राहण्याची हिंमत दाखवतो. मला जशी क्षेत्ररक्षण करण्याची आवड होती. तशी कोहलीला क्षेत्ररक्षण करण्याची आवड आहे.’
टीम इंडीयाची धुरा सचिन तेंडुलकरनंतर विराट सांभाळू शकतो, याआधी डॉन ब्रॅडमन यांनी सचिन तेंडुलकर मला माझीच आठवण करून देतो असं म्हटले होते. आता विराट कोहलीला रिचर्डस यांच्याकडून तशीच शाबासकी मिळाली आहे. त्यामुळे विराट सध्या जाम खुश झाला आहे.