मराठी ‘बिग बॉस’चे होस्ट करणार रितेश

काही दिवसापूर्वी मराठीतील ‘बालक पालक’ या सिनेमाच्या यशामुळे खुश असलेला अभिनेता रितेश देशमुख आता लोकप्रिय रियल्टी शो असलेल्या ‘बिग बॉस’ च्या मराठी भागात होस्ट म्हणून काम करणार असल्याचे समजते. ‘बिग बॉस’ च्या टीमने रितेश पुढे ऑफर ठेवली आहे. मात्र रितेशने अजून तरी होकार अथवा नकार कळवलेला नाही. त्यामुळे काहीसा पेच निर्माण झाला आहे.

याबाबत बोलताना रितेश म्हणला की, ‘मराठी ‘बिग बॉस’ च्या बाबतीत आताच काही बोलणे म्हणजे अतिशोक्ती ठरेल. सध्या गेल्या काही दिवसापासून मी ‘बालक पालक’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक तयार करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे मी त्या सिनेमाच्या कामात सध्या तरी व्यस्त आहे. ‘बिग बॉस’ च्या टीमने माझ्याकडे ऑफर ठेवली आहे. मात्र अजून तरी या बाबतीत मी काहीच निर्णय घेतला नाही.’

जर आगामी काळात अभिनेता रितेश देशमुखने ‘बिग बॉस’ चे होस्ट करण्याचा निर्णय घेतला तर मराठीतील त्याच्या प्रशसकासाठी एक वेगळीच पर्वणी ठरणार आहे.