चीनला पुन्हा भूकंपाचा हादरा; ६१ जखमी

बीजिंग,दि.२६ -चीनला आठवडाभराच्या कालावधीत काल दुसरयांदा भूकंपाने हादरवले. या भूकंपात ६१ जण जखमी झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.८ इतकी नोंदली गेली.

काल सकाळी झालेल्या भूकंपामुळे प्रामुख्याने चीनच्या सिचुआन प्रांतातील यिबिन शहरात सर्वाधिक नुकसान झाले. या धक्क्यामुळे २९ हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे सुमारे ४६ दशलक्ष डॉलर्सची वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

भूकंपानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. चीनमधील सिचुआन प्रांतालाच मागील शनिवारी ८.0 तीव्रतेच्या भूकंपाने हादरवले होते. त्यात सुमारे दोनशे जण मृत्युमुखी पडले, तर हजारो जखमी झाले. या प्रांतामध्ये मागील काही दिवसांत ४ हजारहून अधिक ऑफ्टरशॉक्सची नोंद झाली आहे.