नवी कार अन् जॉन बरोबर करण जोहर?

जॉन अब्राहम कोणाला ठाऊक नाही? बॉडी बिल्डर, हॅण्डसम हिरो म्हणून अशा या जॉन अब्राहम च्या चाहत्यांमध्ये तरुणींची संख्या मोठी आहेच पण हिरोइन्सची
देखील कमी नाही पण..जॉन ने 3 कोटी 40 लाखाची ब्लॅक गॅलार्डो एल.पी. 550-2 लॅम्बोर्गिनी ही नवी अलिशान कार खरेदी केली. आता नवी कार घेतल्यावर कोणी
घरी जातो. पूजा करता घरच्यांना फिरवून आणतो. पण एवढाच सज्जन नसेल कोणी तर मैत्रीणींकडे कोणी जाईल पण जॉनच्या बाबतीत असे काहीच झाले नाही. जॉन ने आपल्या नव्या कार मध्ये निर्माता करण जोहर ला बसवले आणि भन्नाट होय.भन्नाट राईडवर नेले. आता कोण काय म्हणेल याची चिंता करणारा जॉन नक्कीच
नाही. त्याच्याकडे ऑडी क्यू 7 मॉडेल अगोदर आहेच. पण या गाडीत म्हणे करण जोहर ही भलताच खूश झाला. एकंदरीत ही नवी कार दोघांना भाग्यशाली ठरते की
काय? हे येणारा काळच सांगेल म्हणजे येणार्या काळात त्यांचे कोण कोणते सिनेमे येतात ते दिसेलच.