सस्पेन्स, थ्रिलर हिंदी, इंग्रजी सिनेमात का रुचतो मग मराठी सिनेमात का रुचत नाही? असा सवाल करीत मराठी रसिकांना सस्पेन्स-थ्रिलर असा मराठी
सिनेमाही आवडतो ते ’येडा’ दाखवून देईल असे येथे प्रख्यात अभिनेता आशुतोष राणा यांना सांगितले. मराठीत सर्वप्रथम भूमिका असलेला आशुतोष राणा यांचा
’येडा’ येत्या 19 एप्रिल ला प्रदर्शित झाला. त्यानिमित्त त्यांनी पुण्यातील बहुतांशी पत्रकारांशी सुसंवाद साधला. यावेळी दिग्दर्शक किशोर बेळेकर, अभिनेत्री डॉ. प्रज्ञा शास्त्री, अभिनेता सतिश पुळेकर उपस्थित होते.
ते म्हणाले, महाराष्ट्रात केवळ विनोदी, कौटुंबिक, ऐतिहासिक,पौराणिक आशयाचेच मराठी सिनेमे चालतात मराठीत सस्पेन्स, थ्रिलर असे काही चालत नाही, असे मला हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सांगितले गेले. पण जर याच महाराष्ट्रात सस्पेन्स थ्रिलर हिंदी-इंग्रजी सिनेमे आवडीने पाहण्यात येतात तर मराठी का चालणार नाही? ’येडा’ पाहिल्यावर याचे उत्तर रसिक प्रेक्षकच देतील. या चित्रपटात एकही गाणे नाही. आपण ’अप्पा कुलकर्णी’ या ईश्वरभक्ताची भूमिका साकारली आहे. ईश्वराशीच ज्यानेद्वंद्व आरंभले आहे. किशोरी शहाणे यांनी अप्पा कुलकर्णी च्या पत्नीची भूमिका साकारली आहे. विशिष्ट स्तरावर माणसाची सटकते, नियंत्रण सुटते अशा नियंत्रण सुटलेल्या माणसाची ही कथा आहे.