सलमानला झाला २५ कोटीचा तोटा

मुंबई आणि साउथच्या स्टंटमैन सोबत झालेल्या वादामुळे सलमान खानला २५ कोटी रुपयचा तोटा झाला आहे. सलमान आणि सोहेल खानने आगामी काळात येत असलेल्या ‘मेंटल’ या सिनेमाच्या फाइट सीन शूटसाठी डायरेक्ट करण्यासाठी साउथचा प्रमुख फाइट मास्टरची नियुक्ती केली होती.

या सिनेमातील फाइट सीन लोकल ठिकाणी शूट करण्यात येणार होते. त्यासाठी ऑल इंडिया फिल्म एंप्लॉयी कन्फेडरेशन (एआईएफईसी) च्या नियमानुसार, ७० टक्के अर्टिस्ट लोकल असावेत तर ३० टक्के स्टंट आर्टिस्ट बाहेरचे असवेत असा नियम आहे. त्यामुळे फाइट डायरेक्टरला आर्टिस्ट सोबत सीन डायरेक्ट करताना अवघड जात नाही. मात्र त्याने आर्टिस्टचे हे प्रमाण ५० टक्केपर्यंत आणले.

या सर्व प्रकारामुळे कोल्हापुरमधून शूटिंग यूनिटला आठ दिवसात काहीच शूटिंग न करता परतावे लागले. शुटींगसाठी १५ दिवस बुकिंग करण्यात आली होती. या सर्व प्रकारामुळे सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खानला दिवसाला दोन कोटी रुपये प्रमाणे सुमारे २५ कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यासोबतच लवासा मधील सिनेमाचे शूटिंग पुर्ण करण्यासाठी साउथ इंडिया फिल्म एंप्लॉयी फेडरेशनचे आर्टिस्ट त्याठिकाणी पोहचले नाहीत. या सर्व प्रकारामुळे बॉलिवुड डायरेक्टरने साउथ स्टंट डायरेक्टर्सला आता काम देणेच बंद केले आहे.