पुणे, दि. 21 (प्रतिनिधी) – आशयघन मराठी चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी चित्रपट परिवार आणि नलिनोत्तम संस्थेतर्मे 27 आणि 28 एप्रिल रोजी पहिल्या मराठी चित्रपट परिवार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिला मराठी चित्रपट परिवार महोत्सव
प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रभात रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सतीश मन्वर आणि अभिनेत्री विभावरी देशपांडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात स्पर्धात्मक विभागामध्ये धग, अनुमतीम टुरींग टॉकीज, श्री पार्टनर आणि आभरान या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवातील हे सर्व चित्रपट प्रेक्षकांसाठी मोमत दाखविण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी, निर्माते मेघराज राजेभोसले, वैभव जोशी, इम्पाचे संचालक विकास पाटील यांच्या हस्ते 28 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
