डायन : एक थरारक अनुभव

डायन हा शब्द अपरिचित असलेला माणूस भारतात सापडणे अशक्यप्राय बाब आहे. ग्रामीण भागाचा विचार केला तर प्रत्येक खेड्यात एखादी तरी डायन भोवती मिरणारी दंतकथा प्रसिद्ध असते. विज्ञान तंत्रज्ञानाच्या जमान्यात हा सगळा प्रकार अंधश्रद्धेचा भाग आहे. पण, तंत्र-मंत्र मानणार्‍यांच्या मते त्यांचं अस्तित्व असते. पण, या चर्चा शेवटी निष्मळ ठरतात. त्यांचा अंत नाही. काळ्या जादूवर पूर्ण विश्वास ठेवून ‘ एक थी डायन’ ही कथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली आहे.

‘ एक थी डायन’ ची कथा फिरते बोबो (इमरान हाश्मी) या जादुगरा भोवती फिरणारी आहे. त्याची गर्लफ्रेंेंड तामारा (हुमा कुरैशी) आणि बोबो या दोघांनाही एखाद्या मुलाला दत्तक घेण्याची तीव्र इच्छा आहे. परंतू, यासाठी अट आहे ती म्हणजे या दोघांनीही लग्नाच्या बंधनात अडकावं. दरम्यान बोबोच्या आयुष्यात काही अनुचित प्रकार घडतात. याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करताना त्याच्या बालपणीच्या काही गोष्टी संमोहनाच्या माध्यमातून समोर यायला सुरुवात होते. ज्यामध्ये एका डायना ( कोंकणा सेन शर्मा) नावाच्या डायननं त्याच्या संपूर्ण परिवाराला उध्वस्त केल आहे आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा येण्याचे धमकी दिली आहे.

जादुचे शो सादर करताना झालेल्या अनुचित प्रकारांकडे बोबो पहिल्यांदा दुर्लक्ष करतो. पण, अचानक त्याच्या आयुष्यात लीसा दत्त (कल्कि कोचलिन) येते आणि बोबोला लीसाचं डायन असल्याचा भास व्हायला सुरूवात होते. पण, जेव्हा सस्पेन्स हळूहळू खुलतो आणि खरीखुरी डायनम समोर येते तेव्हा प्रेक्षकांना एका नव्या रोमांचाचा अनुभव यायला सुरुवात होते. यामुळेच हा सस्पेन्स काय आहे हे तुम्ही स्वत:त चित्रपटगृहात जाऊन अनुभवलेला अधिक उत्तम.
एकता कपुर आणि विशाल भारद्वाजची निर्मिती असलेला ‘ एक थी डायनम हा हिंदीतील पहिला चित्रपट आहे जो जादू-टोन्यावर पूर्णत: विश्वास टाकून सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पडद्यावरही हा चित्रपट एक थरारक अनुभव देऊन जातो, विशाल भारद्वाज यांचा ‘मकडी’ चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. त्यात डायनच्या जाळ्यात अडकलेल्या जुळ्या मुलींची कथा होती.,शेवटी शबाना आझमी डान नसून एक ठग असल्याचे स्पष्ट होते. मात्र ‘एक थी डायन’ हा चित्रपट त्याच्या पेक्षा विरूद्ध म्हणजेच भूतांवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहन देणारा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कथा, कथेला दिलेली ट्रिटमेंट याबरोबरच कलाकारांचा अभिनय ही एक थी डायनची जमेची बाजू आहे. कोंकणा सेन शर्मा ने उत्कृष्ट परमॉर्मन्स दिला आहे. आपण कोणत्याही भूमिका करण्यासाठी अगदी सक्षम आहोत, हे तिनं पुन्हा एकदा दाखवून दिल आहे, इमरान हाश्मीचंही काम अतिशय सुंदर आहे. चित्रपटाचा संपूर्ण भार त्यानं आपल्या खांद्यावर घेतला आहे, कल्कि कोच्लिनचाही परमॉर्मन्स मस्त आहे. मॉर्डन लुक मधली हुमा कुरेशी या निमित्ताने आपल्याला भेटली आहे. लव शव ते चिकन खुराणा आणि गँग्ज ऑम वासेपुर 2 मध्ये तीने ग्रामिण छटा असलेल्या भूमिका केल्या होत्या.

एकूणच काय तर एक थी डायनम हा एक कल्पनाशील आणि सुपरनॅचरल असा थ्रिलर चित्रपट आहे. तांत्रिक दृष्ट्या अतिशय सक्षम चित्रपट कानन अय्यरने दिला आहे हे निश्‍चित. ज्या लोकांना थ्रिलर चित्रपट आवडतात त्यांची कुठेही निराशा होणार याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. स्पेशल इमेक्टस्, आर्ट डायरेक्शन आणि साऊंड इमेक्टस् भन्नाट आहेत. श्रद्धा – अंधश्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्‍न आहे. एक थरारक अनुभव घेण्यासाठी एक थी डायनाअवर्जून बघावा असाच आहे.

चित्रपट – एक थी डायन
निर्माता – एकता कपूर, शोभा कपूर, विशाल भारद्वाज,
दिग्दर्शक – कानन अय्यर
संगीत – विशाल भारद्वाज
कलाकार – इमरान हाश्मी, हुमा कुरैशी, कल्कि कोचलीन, कोंकणा सेन शर्मा

रेटिंग – * * *
रेटिंग – वाईट – *, बरा – **, चांगला – ***, उत्कृष्ट – ****, सर्वोत्कृष्ट – *****.

Leave a Comment